॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो.

11 months ago
approved

कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही.

11 months ago
approved

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.

11 months ago
approved

आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो.

11 months ago
approved

पुढे पाहत चालावे तर पायात काटे टोचतात, आणि पायात काटे टोचतात म्हणून खाली पाहत चालावे तर वाटच चुकते, प्रवासाची दिशाच बदलून जाते कदाचित यालाच जीवन म्हणतात वाटत.

11 months ago
approved

कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून, त्याच्या भविष्याची टर उडवू नका. कारण, काळ इतका ताकदवान आहे कि, तो एका सामान्य कोळशालाही हळू हळू हिऱ्यात बदलतो.

11 months ago
approved

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणे असतात, एकतर आपण, विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी, फक्त विचारच करीत बसतो.

11 months ago
approved

जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही, १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले.

11 months ago
approved

जीवनात सुख दुःख दोन्ही आपण स्वीकारलेच पाहिजेत, कारण ती आपणच निर्माण केलेली आहेत.. हे सूत्र लक्षात घेतले तर, मनुष्य सरळ वागू शकेल.

11 months ago
approved

जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा, कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢