॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

मिञ-मैञिणी हे असेच असतात, पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात, मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात, सुख:-दु:खाची गाणी गुणगुणतात, आणि एके दिवसी मैञीच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं, मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.

11 months ago
approved

मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी, मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी, sमैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी, मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.

11 months ago
approved

हसतच कुणीतरी भेटत असतं, नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं, दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं, याचचं तर नाव “मैत्री”असं असत.

11 months ago
approved

मैत्री एक गांव असत आणी मैत्रिण हे त्याहून सुन्दर नाव असत हे नाव असत आनंदाच नाव असत दिलेल्या धीराच, मदतीच्या हाताच आयुष्यातल्या आनंदघनाच मैत्रिण हे नाव असत वरवर साध वाटल तरी काळजाचा ठाव असत.

11 months ago
approved

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांच मन जाणून घेण, चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण, एकमेकांचा आधार बनण, मैत्री म्हणजे अतूट विश्वास. मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.

11 months ago
approved

मैत्री,नको फुलासारखी,शंभर सुगंध देणारी. नको सूर्यासारखी ,सतत तापलेली. sनको चंद्रासारखी,दिवसा साथ न देणारी. नको सावली सारखी,कायम पाठलाग करणारी. मैत्री हवी अश्रुसारखी, सुख दुखात समान साथ देणारी.

11 months ago
approved

असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, ह्रदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.

11 months ago
approved

मैत्री असावी चंदनासारखी, सुगंध देणाऱ्‍या फुलासारखी, जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी, प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.

11 months ago
approved

काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री. एकटे असल्यावर झालेला खराखूरा भास म्हणजे मैत्री. मरताना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.

11 months ago
approved

बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, एक प्रेमळ भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢