॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Atul's All Messages

Messages posted by Atul

एकदा संता 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून 5 रुपयाचे टिकीट विकत घेतो आणि तो कंडक्टरला म्हणतो, एप्रिल फुल… ”कसे काय?” कंडक्टरने विचारले. कारण माझ्याजवळ ऑल रेडी बसचा पास आहे…!!!

1 year ago
approved

एका समुद्रात जहाज बुडत असत… संता – इथून जमीन किती लांब आहे ? बंता – एक किलोमीटर… संता लगेच पाण्यात उडी मारतो संता – कुठल्या बाजूला बंता – खालच्या…!!!

1 year ago
approved

संता – अरे यार, काल रात्री मी उशिरा घरी पोहचलो तर बायकोने दरवाजाच नाही उघडला… पूर्ण रात्रभर मला रस्त्यावरच झोपावं लागलं… बंता – मग सकाळी तरी बायकोने दार उघडलंच असंन ना…? संता – अरे नाही यार, सकाळी ज्यावेळेस माझी उतरली, त्यावेळेस लक्षात आलं कि माझं लग्नच झालेलं नाही आणि चावी माझ्याच खिशात होती…!!!

1 year ago
approved

संताने एका मोठ्या कंपनीत मुलाखत दिली… बॉस – अभिनंदन, तुमचे सिलेक्शन झाले आहे… तुम्हाला यावर्षी 5 लाख रुपये वार्षिक पगार राहील, आणि पुढील वर्षी 10 लाख रुपये वार्षिक पगार राहील… हे एकूण संता उठून जाण्यासाठी निघतो… बॉस – काय झालं…? संता – मग मी पुढच्याच वर्षी येतो…!

1 year ago
approved

बंता – काय रे तू तर डॉक्‍टरला भेटायला जाणार होता ना, मग त्याचे काय झाले…? संता – अरे यार उद्या जाईल, आज थोडी तब्येत खराब आहे…!!!

1 year ago
approved

बंता एका सॉफ्टवेअर कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो… मॅनेजर – ‘जावा’ चे चार व्हर्जन सांगा . . .? बंता – मर जावा मिट जावा लुट जावा सदके जावा मॅनेजर – वेरी गुड . . तुम्ही आता घरी जावा . . !

1 year ago
approved

पति – आज घर आवरलेलं आहे. तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज ? पत्नी – नाही हो… फोनचा चार्जर सापडत नव्हता… तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!

1 year ago
approved

बायको – माझा मोठेपणा बघा …. मी तुम्हाला न बघताच तुमच्याशी लग्न केलं. नवरा – त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ … मी तुला बघून सुध्दा तुझ्याशिच लग्न केलं…

1 year ago
approved

बायको – अहो, ऐकता का…? नवरा – हा… बोल… बायको – अहो डॉक्टरने मला एक महिना कुठेतरी विदेशात जाऊन आराम करायला सांगितला आहे… मग आपण कधी जायचं…? नवरा – उद्या… बायको – अय्या, हो… आपण कुठे जायचं…? नवरा – दुसऱ्या डॉक्टरकडे…!!!

1 year ago
approved

बायकोला गजरे हवे होते… तिनं मेसेज पाठवला इंग्रजीत…. Yetana 5 Gajre gheun ya… तो येतांना 5 गाजरं घेऊन आला… उपाशी झोपला, काय चुकल बिच्याऱ्याच…?? म्हणून मेसेज मराठीतच टाईप करा…!!!

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢