॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Rajashree's All Messages

Messages posted by Rajashree

प्रेमाने जोडलेली चार माणसे, आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत.

11 months ago
approved

माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता, आणि हृदयात गरिबीची जाण, असली की, बाकी गोष्टी आपोआप घडत जातात.

11 months ago
approved

कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अगदी छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण पाणीच! मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा.

11 months ago
approved

आयुष्यात एकदा तरी, “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय, “चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही !

11 months ago
approved

हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते.. कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते.. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

11 months ago
approved

आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला, हिम्मत लागत नाही.. हिम्मत लागते ती, तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला.

11 months ago
approved

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तितके थोडे आहे.

11 months ago
approved

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर, आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून, पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे.

11 months ago
approved

ताकदीची गरज त्यांनाच लागते, ज्यांना काही वाईट करायचे असते, नाही तर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते, कारण प्रेमानेच जग जिंकता येते.

11 months ago
approved

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात.

11 months ago
approved
🟢 Online (1) 🟢